महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस; पिकांना जीवदान - नांदेड पाऊस

जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचे आगमन झाले असून काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरी कोसळल्या आहेत. सोयाबीन आणि कापसाची पिके अक्षरशः पाण्याअभावी सुकून जात होती. तसेच अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ही पेरणी संकटात सापडली होती. या पावसामुळे जिल्ह्यातल्या कांही भागातील पिकांना जीवदान मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

rain
rain

By

Published : Jul 9, 2021, 10:05 AM IST

नांदेड - जिल्ह्यात बुधवारपासून पावसाचे आगमन झाले असून काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरी कोसळल्या आहेत. सोयाबीन आणि कापसाची पिके अक्षरशः पाण्याअभावी सुकून जात होती. तसेच अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही ही पेरणी संकटात सापडली होती. या पावसामुळे जिल्ह्यातल्या कांही भागातील पिकांना जीवदान मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.

महसूल मंडळातील पावसाची नोंद..

दिनांक ८ जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात नांदेड जिल्ह्यात पुढील प्रमाणे महसूल मंडळात पावसाची नोंद करण्यात आली आहे. किनवट ७४ मिलीमीटर, धर्माबाद ७२ मिलीमीटर, मुदखेड ६९ मिलीमीटर, निवघा ६७ मिलीमीटर, पिंपरखेड ६३ मिलीमीटर, मुखेड ६२ मिलीमीटर, तामसा ५८ मिलीमीटर, वानोळा ५५ मिलीमीटर, बिलोली ५१, मिलीमीटर, भोकर ४८ मिलीमीटर, कंधार ४६ मिलीमीटर, आष्टी ४५ मिलीमीटर, नांदेड ४४ मिलीमीटर, ऊमरी ४३ मिलीमीटर, नायगाव ४० मिलीमीटर, हदगाव ४० मिलीमीटर, हिमायतनगर ३३ मिलीमीटर, अर्धापूर ३३ मिलीमीटर, देगलूर ३२.४० मिलीमीटर, शिंधी ३० मिलीमीटर, सिंदखेड २६ मिलीमीटर, माहूर २१ मिलीमीटर, लोहा २० मिलीमीटर, गोळेगाव २० मिलीमीटर, वाई १९ मिलीमीटर, मनाठा १८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस..

विष्णूपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला..

नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा बुधवारी सकाळी उघडण्यात आला. आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस नसला तरी वरच्या बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्याने प्रकल्पाचा दरवाजा उघडण्यात आला. आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. मात्र गतवर्षी उशिरा झालेल्या पावसाने जिल्ह्यातील पाणीसाठ्यात बऱ्यापैकी पाणी होते. त्यामुळे आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसाने विष्णुपुरी प्रकल्प भरल्याने एकदा पाणी सोडण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले. विष्णुपुरी प्रकल्प भरलेला असल्याने खबरदारी म्हणून प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून पाण्याचा ४०६ क्युसेक प्रति सेकंदवेगाने विसर्ग करण्यात येतोय. सध्या प्रकल्पाची पाण्याची पातळी ३५४ मीटर इतकी असून ८४ टक्के पाणीसाठा आहे . प्रकल्पाचा दरवाजा उघडण्यात आल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर पाण्याचा येवा वाढल्याने वाळू उपासाही वाढला आहे. त्यामुळे नदी परिसरात अनेक ठिकाणी कलम १४४ देखील लागू करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details