नांदेड - मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठा शिष्यवर्ग असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज हे जिवंत समाधी घेणार असल्याची काल अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, महाराज जिवंत समाधी घेणार नाहीत, त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते प्रा.मनोहर धोंडे यांनी दिली.
शिवलिंग शिवाचार्य महाराज समाधी घेणार नाहीत; प्रकृती चांगली असल्याची माहिती - शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी
शुक्रवारी महाराज जिवंत समाधी घेणार असल्याची अफवा पसरली होती. यामुळे अहमदपूरमध्ये हजारो भक्तांची गर्दी जमली होती. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या काही भक्तांनी दिली आहे.
शिवलिंग शिवाचार्य महाराज
Last Updated : Aug 29, 2020, 5:12 PM IST