महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून गुटख्याची वाहतूक, 36 लाखांचा मुद्देमाल जप्त - नांदेड जिल्हा बातमी

नांदेड शेजारील असलेल्या कर्नाटक राज्यातून कांद्याच्या ट्रकमध्ये 'अत्यावश्यक सेवा' असा फलक राज्यात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.

Nanded
गुटख्याची वाहतूक

By

Published : May 6, 2020, 5:09 PM IST

नांदेड- राज्यात गुटखाबंदी असल्याने काही जण इतर राज्यातून गुटखा आणून त्याची बेकायदेशीर विक्री करत आहेत. अनेक जण अत्यावश्यक सेवा देण्याच्या नावाखाली गोरखधंदे करत आहेत. नुकतेच अत्यावश्यक सेवेचे स्टिकर लावून गुटख्याची वाहतूक करण्यार ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नांदेड-देगलूर रोडवर चंदासिंi कॉर्नर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ट्रकसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली ट्रकमधून गुटख्याची वाहतूक

नांदेड शेजारील असलेल्या कर्नाटक राज्यातून कांद्याच्या ट्रकमध्ये 'अत्यावश्यक सेवा' असा फलक राज्यात गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार नांदेड-देगलूर रोडवर कर्नाटक येथून येणाऱ्या ट्रकला पोलिसांनी शहराबाहेर चंदासिंi कॉर्नर येथे अडवून ट्रकची झडती घेतली. यामध्ये ट्रकमध्ये सुरुवातीला कांदे भरलेले पोती होती व त्या पोत्यामागे जवळपास ट्रकच्या सर्वच भागात गुटख्याच्या पोती होती.

या प्रकरणी पोलिसांनी या ट्रकसह सुमारे 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा गुटखा हा हिमायतनगर येथील गुटखा माफियाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details