नांदेड - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारत देशात 22 मार्चपासुन लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे मद्यविक्री बंद आहे. याचा फायदा घेऊन गुटखा, सिगारेट, मद्य यांची राज्यात चोरटया मार्गाने विक्री होत आहेत. गुरुवारी नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याची अवैध आणि छुप्या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख ६४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.
अवैधरित्या गुटखा वाहतुक करणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात, 8 लाखांहून अधिकचा गुटखा जप्त
लॉकडाऊनच्या या काळात अत्यावश्यक सेवा सोडल्यास सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे मद्यविक्री बंद आहे. याचा फायदा घेऊन गुटखा, सिगारेट, मद्य यांची राज्यात चोरटया मार्गाने विक्री होत आहेत.
हेही वाचा...ईटीव्ही इफेक्ट : बदनापूरच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार निलंबित
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. भारती आणि पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इस्लामपूरा भागात घडक कारवाई केली. यावेळी अब्दुल रहेमान मस्जिदजवळील एक चारचाकी वाहन (वाहन क्रमांक एम. एच. ०४ एफ. जे. ०४३७) आणि वाहनाचा चालक शेख अकबर शेख खाजामियाँ (२८ रा. मिल्लतनगर, नांदेड) यांना ताब्यात घेतले. यावेळी वाहनात तब्बल ८ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा गुटखा साठा आढळला. पोलिसांनी वाहन जप्त केले आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई पूर्ण केली.