नांदेड -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नांदेड येथे दोनशे खाटांचे तात्पुरत्या स्वरुपातील जंबो कोविड सेंटर उभारले जात आहे. दरम्यान पुढील आठवड्याभरात ते कार्यरत होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. आज सांयकाळी नांदेड जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची आढावा बैठक त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या आजच्या आढावा बैठकीत नियोजित जंबो कोविड सेंटरच्या उभारणीवर चर्चा झाली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नांदेड येथे अस्थायी जंबो कोविड सेंटर उभारले जाते आहे. या सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधेसह कोरोनावरील आवश्यक त्या उपचार सुविधा उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन व रेमडेसिवीरसारख्या औषधांची मागणी व पुरवठा यावर चर्चा करण्यात आली.
दररोज २ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत निर्देश
या बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी संपर्क साधून, नांदेड जिल्ह्याच्या मागणीनुसार दररोज २ हजार रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात डॉक्टर व नर्सेसची कमतरता नसून, आवश्यक तिथे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेसाठी खासगी डॉक्टरांचीही सेवा घेतली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
कोरोना लसीकरण वाढवण्याचे निर्देश