महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकणात वाहून जाणारे पावसाचे पाणी मराठवाड्यात आणण्याचे प्रयत्न; पालकमंत्री रामदास कदम

दरवर्षी कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. त्या पाण्याला मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मराठवाडा सध्या तहानलेलाच आहे, अनेक ठिकाणी पावसाच्या अतिरेकामुळे जीवित व वित्तहानी झाली. त्यातही मराठवाड्याने त्यांना मदतीचा हातभार दिला.

रामदास कदम

By

Published : Aug 15, 2019, 11:36 PM IST

नांदेड - कोकणात पावसाचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्या संदर्भाने लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी दिली.ते गुरुवारी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहनासाठी आले होती. त्यावेळी बोलत होते.

दुष्काळी मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी लवकरच मोहीम - पालकमंत्री रामदास कदम


दरवर्षी कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. त्या पाण्याला मराठवाड्याकडे वळविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मराठवाडा सध्या तहानलेलाच आहे, अनेक ठिकाणी पावसाच्या अतिरेकामुळे जीवित व वित्तहानी झाली. त्यातही दुष्काळाने होणाऱ्या होरपळीला विसरून मराठवाड्याने त्यांना मदतीचा हातभार दिला. मराठवाड्यात सध्या असलेली पावसाची कमतरता लक्षात घेवून शासनाने पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करणाऱ्या लोकांना २० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले असल्याचेही कदम म्हणाले.


नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सुध्दा पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करण्याचे काम सुरू करण्यात आल्याबद्दल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना शाब्बासकी दिली. मराठवाड्यात असलेल्या कमी पावसामुळे ज्या समस्या उदभवतील त्या सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.


पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापुराने बाधित नागरिकांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी येथील दत्ता देशमुख, विजय देशमुख, विक्रांत देशमुख, बालाजी नरंगले तसेच पत्रकारांनी धनादेश दिले. ते धनादेश आज पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details