नांदेड -लग्न म्हटलं की आयुष्याची नवीन सुरवात... सर्व कुटुंब यामध्ये सहभागी होऊन मोठ्या आनंदात लग्नाची तयारी करतात. जवळील पाहूणे मंडळी मोठ्या उत्साहात वर-वधूला आशिर्वाद देण्यासाठी लग्नकार्यात येतात. मात्र नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात मनाला चटका लावणारी घटना घडली. आज (7 एप्रिल) उत्तम शिराणे (वय 26) हे लग्नाच्या बेडीत अडकणार होते. मात्र संसार थाटण्यापूर्वीच वराचं निधन झाल्याची बातमी घरी आली. त्यामुळे क्षणातच आनंदाचे क्षण दुख:त पलटले. कारण घोड्यावरून वरात काढून लग्नाचा आनंद साजरा करण्याऐवजी तिरडीवरून नवरदेवाचा मृतदेह नेण्याचा प्रसंग शिराणे कुटुंबावर आला. दोन्ही कुटुंबात लग्नाची जय्यत तयारी जवळपास पूर्ण झाली होती. हा आंनदाचा क्षण येण्याअगोदरच वधू-वराच्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तमच्या आठवणीने 'ईटीव्ही भारत' शी बोलताना कुटुंबाला गहिवरून आले होते.
भावी आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या नववधूचा आयुष्यात देखील दुख:चा डोंगर-
येत्या 7 एप्रिल रोजी सकाळी बोहल्यावर बसणार असलेले उत्तम भुजंगराव शिराणे २ एप्रिल रोजी सकाळी लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी मोटारसायकलने जात होते. दरम्यान, नांदेडकडे येत असताना त्यांना बारड-भोकर फाटा रोडवर निर्मल काॅटन इंडस्ट्रीज समोर अचानक अज्ञात वाहनानी जोराची धडक दिली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत उत्तम शिराणे यांचा बळीरामपूर तालुक्यातील वैष्णवी यांच्याशी विवाह होणार होता. परंतु विवाह बंधनात अडकण्यापूर्वीच लग्न समारंभाचे निमंत्रण पत्रिका वाटप करण्यासाठी निघालेल्या नवरदेवावर काळाने झडप घातली. यामध्ये भावी आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या नववधूचा आयुष्यात देखील दुख:चा डोंगर कोसळला.
शिराणे कुटुंबाची परिस्थिती हालाखीची...!