नांदेड - गावठाणमधील असलेला प्लॉट ग्रामपंचायतच्या नमुना नं 8 वर नावे करण्यासाठी 1 लाख 50 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तालुक्यातील राहटीच्या ग्रामविकास अधिकारी हनमंत मष्णाजी वाडेकर याला रंगेहात पकडण्यात आले आहे़.
दीड लाखाची लाच घेताना ग्रामसेवकाला पडकले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई - nanded news
नांदेड तालुक्यातील राहटी येथे तक्रारदाराच्या राहत्या घराच्या बाजूला गावठाणचा प्लॉट आहे़. तो प्लॉट तक्रारदाराच्या ताब्यात 50 वर्षापासून आहे़. हा प्लॉट तक्रारदारच्या नावे ग्रामपंचायतीच्या नमुना नं 8 वर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी हनमंत वाडेकर याने दीड लाख रुपये लाच मागितली़.
नांदेड तालुक्यातील राहटी येथे तक्रारदाराच्या राहत्या घराच्या बाजूला गावठाणचा प्लॉट आहे़. तो प्लॉट तक्रारदाराच्या ताब्यात 50 वर्षापासून आहे़. हा प्लॉट तक्रारदारच्या नावे ग्रामपंचायतीच्या नमुना नं 8 वर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी हनमंत वाडेकर याने दीड लाख रुपये लाच मागितली़. या प्रकरणी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़. या तक्रारीवरून 8 सप्टेंबर रोजी ग्रामविकास अधिकारी वाडेकर यांच्या राहत्या घराच्या परिसरात सापळा रचण्यात आला़. हनमंत मष्णाजी वाडेकर याने लाचेचे 1 लाख 50 हजार रुपये खासगी व्यक्ती बालाजी मरीबा वाघमारे यांच्यामार्फत स्वीकारले. या प्रकरणी विमानतळ ठाण्यात ग्रामविकास अधिकारी वाडेकर याच्यासह बालाजी वाघमारेविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी, कपील शेळके, पो़ना़ एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, नरेंद्र बोडके, आशा गायकवाड यांनी केली़.