महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : नांदेड रेल्वे स्थानकावर गरजूंना अन्नधान्याचे वाटप

प्रवासी रेल्वेसेवा बंद असल्यामुळे विविध रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही अंशी आर्थिक अडचण येत असेल. या भावनेतून नांदेड रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकावर अशा गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. तसेच नांदेड रेल्वे स्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग, यांनी पार्सल पोर्टर (कुली) आणि पार्सल हमाल यांना अन्नधान्याचे वाटप केले.

नांदेड रेल्वे स्थानकावर गरजूंना अन्नधान्याचे वाटप
नांदेड रेल्वे स्थानकावर गरजूंना अन्नधान्याचे वाटप

By

Published : Apr 10, 2020, 11:58 AM IST

नांदेड -नांदेड रेल्वे स्थानकावर गरजूंना अन्नधान्य पाकिटांचे वाटप करण्यात आले. या पाकीटात गहू, पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साखर, इत्यादी वस्तू आहेत. नांदेड विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी जमवलेल्या निधीतून हे अन्नधान्य वाटप करण्यात आले असून नांदेड रेल्वे विभागातील इतर रेल्वे स्थानकावर हि केले जात आहे.

नांदेड रेल्वे स्थानकावर गरजूंना अन्नधान्याचे वाटप

सर्व देशावर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकट ओढवले आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व प्रवासी रेल्वेसेवा १४ एप्रिलपर्यंत देशभर बंद आहेत. परंतु, त्याचवेळेस अत्यावश्यक वस्तू, अन्नधान्य, खते-बियाणे, कोळसा, भाजीपाला, दूध, इत्यादी जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू घेऊन भारतीय रेल्वे मध्ये माल वाहतूक सेवा सुरू आहे. सर्व रेल्वे स्थानकावरील आणि नियंत्रण कार्यालयातील कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्याकरिता रेल्वे प्रशासन प्रयत्न करत आहे.

नांदेड रेल्वे विभागीय रुग्णालयाची पाहणी करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग

प्रवासी रेल्वेसेवा बंद असल्यामुळे विविध रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काही अंशी आर्थिक अडचण येत असेल. या भावनेतून विविध रेल्वे स्थानकावर काम करून पोट भरणाऱ्या लोकांची अडचण लक्षात घेऊन रेल्वे नांदेड विभागात अशा लोकांची अन्नधान्यांची सोय करण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी पुढाकार घेतला आहे आहे. नांदेड रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकावर अशा गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. तसेच नांदेड रेल्वे स्थानकावर उपिंदर सिंग, यांनी पार्सल पोर्टर (कुली) आणि पार्सल हमाल यांना अन्नधान्याचे वाटप केले.

याप्रसंगी वाणिज्य व्यसथापक दिवाकर बाबू, विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन विनू देव हे उपस्थित होते. यावेळी उपिंदर सिंग यांनी नांदेड रेल्वे विभागीय रुग्णालयास भेट दिली. या दवाखान्यात कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना जर गरज पडली तर कशाप्रकारे औषधोपचार करता येतील याची पाहणी केली. विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा आणि इतर डॉक्टर करत असलेल्या तयारीबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details