नांदेड - कोरोनाचा कहर आणि नैसर्गिक संकटाने ग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील ११ खरेदी-विक्री केंद्रावर १ मे पासून आधारभूत खरेदी योजनेतंर्गत धान्य खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.
कोरोनामुळे कामकाज ठप्प असल्याने आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मालात अडत्यांकडून होणारी मनमानी, शेतकऱ्यांची होणारी लुट यात शेतकरी भरडला जात आहे. याबाबत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्र चालू करण्याची मागणी केली होती. आणि याचा पाठपुरावा केला. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जिल्ह्यातील ११ खरेदी विक्री केंद्रावर आधारभूत खरेदी योजनेतंर्गत १ मे ते ३० जून या कालावधीत भरडधान्य, मका, ज्वारी, धान, भात हमी भावाने खरेदी करण्यास परवानगी दिली आहे.