महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड : पाहा सहस्त्रकुंड धबधब्याचे आक्राळ रूप - इस्लापूर सहस्रकुंड

मुसळधार पावसाने सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे. जवळपास ८० ते १०० फुटावरुन कोसळणाऱ्या या धबधब्याचे दृश्य डोळयांत साठवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

मुसळधार पावसाने सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे.

By

Published : Aug 3, 2019, 9:25 PM IST

नांदेड - मुसळधार पावसामुळे सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे. या मुसळधार पावसाने पैनगंगा नदीचे पात्र प्रथमच दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पैनगंगा नदीवरील इस्लापूर जवळील सहस्रकुंडच्या धबधब्याचे विशाल रूप पहायला मिळाले आहे.

जिल्ह्यात रात्रभर दमदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीकाठाजवळ असलेल्या हदगाव, हिमायतनगर व किनवट तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुसळधार पावसाने सहस्त्रकुंडच्या धबधब्याने आक्राळ रूप धारण केले आहे.

पैनगंगा नदीचे रुंदावलेले पात्र, काळा पाषण आणि जवळपास ८० ते १०० फुटावरुन कोसळणाऱ्या या धबधब्याचे दृश्य डोळयांत साठवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

दरवर्षी जून महिन्यात हा धबधबा ओसंडून वाहत असतो. मात्र, यंदा पावसाने उशीर केल्याने धबधब्याचे हे नयनरम्य दृश्य पहायला पर्यटकांनी वाट पहावी लागली.

ABOUT THE AUTHOR

...view details