नांदेड -कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अशोक चव्हाण ( Ashok Chavan In Nanded ) यांनी कुसूम सभागृहात कै. कुसूमताई चव्हाण स्मृती पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिने अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे, आदिनाथ कोठारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवर दोन्ही नेत्यांनी मते व्यक्त केली. नामांतराचा विषय हा किमान सामान कार्यक्रमात नव्हता असं वक्तव्य शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी केले होते त्याला दुजोरा आज प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नांदेडमध्ये ( Jayant Patil in Nanded ) दिला.
पेट्रोल डिझेल पुन्हा महागेल -पेट्रोल डिझेलचे आज भाव कमी झाले पण मोदी पुन्हा भाव वाढवतील असे राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणालेत. मनमोहन सिंगाच्या ( Manmohan Singh ) काळात 40 चे पेट्रोल 50 झाले तेव्हा स्मृती इराणी ( Smriti Irani ) या दिवस भर माध्यमांसमोर टिका करत होत्या. पण आता त्या काही सुद्धा बोलत नाहीत. हे विशेष म्हणत जयंत पाटील यांनी स्मृती इराणींचा ही खरपूस समाचार घेतला आहे.
महाराष्ट्रात ED कोणाला माहित नव्हती -केंद्रात जेव्हा शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. त्या वेळेला महाराष्ट्रात ED कोणाला माहित नव्हती तेव्हा फक्त बिडी लोकांना माहित होती.असे जयंत पाटील म्हणाले. शपथ घेताना आम्ही कोनाबद्दल द्वेषभाव ठेवणार नाही अशी शपथ घेतो. पण अलीकडच्या काळात काही लोकांना त्याचा विसर पडला आहे असे जयंत पाटील म्हणाले.
दीपक केसरकर हे खरे शिवसैनिक नाही -दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) हे खरे शिवसैनिक नाही आहेत. त्यांचे मन हे शिवसेनेसारखे नाही पवार साहेबांच्या मागे केसरकर हे गाडीत फिरत होते. असे म्हणत पाटील यांनी केसरकारांना टोला लगावला. बाळासाहेब आणि शरद पवार यांचे संबंध लक्षात घेता यात तथ्थ नाही. त्यांचे काहीच शिवसेनेशी मिळते जुळते नाही. काही दिवसा आधी शरद पवार यांनी शिवसेना फोडली असा आरोप केसरकर यांनी पवारांवर केला होता.