महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोहा अन् कंधार येथे ज्वारी खरेदी केंद्रास शासनाची मंजुरी - loha news

लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020-21 वर्षांमधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरड धान्य खरेदीसाठी शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

आमदार शिंदे
आमदार शिंदे

By

Published : Nov 21, 2020, 6:31 PM IST

नांदेड- लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020-21 वर्षांमधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत भरड धान्य खरेदीसाठी शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. शेतमाला हमीभावात व किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाच्या दिनांक 17 नोव्हेंबर, 2020च्या पत्रकान्वये लोहा व कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची ज्वारी किमान आधारभूत किमतीत खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार व खरेदी-विक्री संघ लोहा येथे शासनाने ज्वारी खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया खरेदी विक्री संघ लोहा कार्यालयात सुरू आहे. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार येथे ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. ज्वारी ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी चालू वर्षाचा सातबारा, होल्डिंग, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आवश्यक आहे.

लोहा व कंधार तालुक्यातील शेतकर्‍यांनी ज्वारी किमान आधारभूत किंमतीत खरेदी, कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार व खरेदी विक्री संघ लोहा करणार असून ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ज्वारी 2 हजार 620 रुपये भाव मिळणार आहे. लोहा व कंधार येथे किमान आधारभूत किंमतीत ज्वारी खरेदी केंद्र सुरू केल्याने लोहा आणि कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details