नांदेड - जिल्ह्यातील शंकरनगर येथील शाळेत शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच नांदेड जिल्ह्यात अशीच एक दुसरी घटना उघडकीस आली आहे. शहराच्या लगत असलेल्या म्हाळजा या गावातील प्रबोधन प्राथमिक विद्यालयात एका शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत विकृत वर्तन केले आहे.
नांदेड : शिक्षकाकडून अश्लील चित्रफीत दाखून तिसरीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - नांदेड जिल्ह्यात मन सुन्न करणारी घटना
नांदेड जिल्ह्यात पुन्हा मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शिक्षकाचा अश्लील चित्रफित दाखवून तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकली वर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. पोलीस अधिकत पास करीत आहेत.
स्वप्नील शृंगारे हा या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. स्वप्नील हा विद्यार्थिनींना बोलवून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत होता. जर हा प्रकार कुणाला सांगितलं तर शाळेच्या इमारतीवरून खाली फेकून देईल, अशी धमकी त्याने विद्यार्थिनींना दिली होती. पण अनैसर्गिक कृत्याने एका मुलीला उलटी झाली आणि सगळा प्रकार गावकऱ्यांना कळला. आज गावकऱ्यांनी सदरची शाळा बंद ठेवून विमानतळ पोलीस स्थानक गाठले आणि पोलिसांत तक्रार केली.
पोलिसांनी लागलीच आरोपी शिक्षक स्वप्नील शृंगारे याला ताब्यात घेतलंय. या आरोपीने अनेक विद्यार्थिनीसोबत असे प्रकार केल्याची माहिती मिळाली आहे. आता पोलीस अधिक तपास करत आहेत.