महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nanded Crime : छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या; युवकावर गुन्हा दाखल - तरुणीसोबत अश्लील चाळे

रस्त्याने जाता-येता गावातीलच एका तरुणाकडून वारंवार अश्लील चाळे आणि अर्वाच्च भाषेत एका तरुणीला शिवीगाळ करण्यात येत होती. याबाबतच्या कुटुंब तक्रार केल्यानंतरही हा प्रकार थांबत नसल्याने तरुणीने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली. ही घटना मुदखेड तालुक्यातील एका गावात २१ जानेवारी रोजी घडली.

Nanded Crime
छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By

Published : Jan 23, 2023, 7:43 PM IST

नांदेड: पीडिता (मृत मुलगी) ही गावातून जात असताना आरोपी हा अश्लील चाळे करीत होता. काही दिवस तिने त्याकडे दुर्लक्ष केले; परंतु आरोपी युवकाकडून दिला जाणारा त्रास वाढतच गेला. त्यामुळे ही बाब तिने आई-वडिलांना सांगितली. पीडितेच्या आई-वडिलांनी आरोपीचे घर गाठून त्याच्या आई-वडिलांना मुलाला समज देण्याबाबत सांगितले. या प्रकारामुळे गावात बदमानी होईल या भीतीने तिने राहत्या घरी सकाळी दहा वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

गुन्हा दाखल : या प्रकरणात मृत मुलीच्या घरच्यांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात मुदखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि एम. ए. यावलीकर करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनीही लगेच घटनास्थळी धाव घेतली होती.


कुटुंबावर शोककळा :मृत मुलीने आई-वडिलांना तिची छेडखानी होत असल्याबाबत माहिती दिली होती. तिच्या पालकांनी आरोपीची समजूतही घातली. परंतु, बदनामीच्या भीतीपोटी तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण आहे.


प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी :छेडखानीचा असाच एक प्रकार नांदेडमधील एका कॉलेजात 28 जुलै, 2022 रोजी समोर आला होता. आपल्या समाजात शिक्षकांकडे नेहमी चांगल्या नजरेने पाहिले जाते. मात्र, आता शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली होती. या महाविद्यालयातील प्राचार्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राचार्यांनी आपल्याच महाविद्यालयातील प्राध्यपिकेकडे शरीरसुखाची मागणी केली होती.

विनयभंगाचा गुन्हा दाखल :आरोपी प्राचार्याने महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली होती. गेल्या दोन वर्षांपासून प्राचार्य सातत्याने अश्लील बोलून त्रास देत होते. त्यांनी हात धरून शरीर सुखाची मागणी केली. नकार दिल्यास अन्य ठिकाणी बदली करू, अशी धमकी दिली. याप्रकरणी प्राचार्याविरोधात पीडित महिलेने नांदेडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेने नांदेडच्या शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली होती.

हेही वाचा :Worli Rape Case : वरळीत 20 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details