महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Girl Suicide in Nanded : 'महिलांच्या हळवेपणाचा फायदा घेणाऱ्यांना फाशी द्या' म्हणत विद्यार्थिनीची आत्महत्या - blackmailing by classmate

नांदेडमध्ये विद्यार्थिनीने बुधवारी रात्री अभ्यासिका कक्षात गळफास घेऊन आत्महत्या ( Student committed suicide by hanging ) केली. मृत्यूपूर्वी गीताने चिठ्ठी लिहिली असून वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर तिने आराेप ( Student suicide note before death ) केले. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Girl suicide due to blackmailing by classmate

Suicide Case In Nanded
विद्यार्थिनीची आत्महत्या

By

Published : Sep 23, 2022, 9:53 AM IST

नांदेड - शहरापासून जवळच विष्णुपुरी येथील श्री गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बीई मेकॅनिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील बामणी वाडा येथील गीता कल्याण कदम (22) या विद्यार्थिनीने बुधवारी (२१ सप्टेंबर) रात्री अभ्यासिका कक्षात गळफास घेऊन आत्महत्या ( Student committed suicide by hanging ) केली. मृत्यूपूर्वी गीताने चिठ्ठी लिहिली असून वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर तिने आराेप ( Student suicide note before death ) केले. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Girl suicide due to blackmailing by classmate

विद्यार्थिनीची आत्महत्या

शिक्षणासाठी नांदेडला - गीता ही २०२० पासून नांदेडला शिक्षणासाठी होती. तिच्या वर्गातील विद्यार्थी आदेश चौधरी त्रास देत असल्याने ती मागील काही दिवसांपासून मानसिक ( blame is on her classmate ) तणावात हाेती. यासंदर्भात तिचा भाऊ ज्ञानेश्वरने पाेलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी ज्ञानेश्वर कदम यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्लॅकमेलचा सुसाइड नोटमध्ये उल्लेख -“मी गीता कल्याण कदम. मी आत्महत्या करत आहे. याचे कारण फक्त आणि फक्त आदेश चौधरी हा विद्यार्थी आहे. त्याने मला मी सेकंड इयरला असल्यापासून खूप त्रास दिला. माझं सगळ्यांशी बोलणं तोडलं. तो म्हणेल तेच मी करायचे, फोटोवरून तो मला ब्लॅकमेलही करायचा, घरी सांगतो म्हणायचा. मग तो म्हणेल ते मी करायचे. यामुळे मला मोठा धक्का पोहोचला. मी मनातून खूप खचले. त्यातून बाहेर येण्यासाठी मला गोळ्या घ्याव्या लागल्या. तरी पण मी बाहेर नाही येऊ शकले. या काळात वैभव क्षीरसागर या माझ्या मित्राने मला यातून बाहेर येण्यासाठी खूप मदत केली. पण मी नाही येऊ शकले. मला झालेला त्रास आठवून खूप त्रास होतो. तो आता मी सहन नाही करू शकत, म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. महिला आयोगाला माझी विनंती आहे की, जे असे समाजातील महिलांच्या हळवेपणाचा फायदा घेतात त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी. आदेश चौधरीला तर फाशीची शिक्षा द्या, प्लीज. त्याच्यामुळे आज मी मरून जात आहे. मी मरण्यामागे आदेश चौधरी याचा दोष आहे.’ गीताच्या सुसाइड नोटमध्ये वरील बाबींचा उल्लेख असल्याचे मोठा भाऊ ज्ञानेश्वर यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

महाविद्यालय प्रशासनाची चौकशी व्हावी -महाविद्यालयातील संचालक व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी या प्रकारावर लक्ष ठेवून हा प्रकार वेळीच रोखला असता तर माझ्या बहिणीने आत्महत्या केली नसती. तरी महाविद्यालय प्रशासनाची चौकशी व्हावी, असे मृत गीताचा भाऊ ज्ञानेश्वर कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

भावाला सांगितला होता प्रकार - गीता ऑगस्ट महिन्यात तिच्या गावाकडे गेली होती. तेव्हा तिने हा प्रकार तिचा भाऊ ज्ञानेश्वरला कदम यांना सांगितला हाेता. तिच्या घरच्यांनी तिला समजावून सांगून त्याच्याकडे लक्ष देऊ नको, अभ्यासाकडे लक्ष देण्याचे सांगितले होते, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details