नांदेड -बिलोली शहरातील नबी आबादी येथील मुकबधीर तरुणीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी ही घटना घडली. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला बिलोली पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस निरक्षक शिवाजी डोईफोडे यांनी दिली.
आई-वडिलांचे छत्र हरवलेली एक 27 वर्षीय मुकबधीर तरुणी शहरातील नवी आबादीत असणाऱ्या आपल्या बहिणीकडे राहत होती. सदर बहिण मोलमजूरी करुन आपल्या मुकबधीर बहिणीची देखभाल करायची. 9 डिसेंबरला पीडितेची बहिण कामानिमित्त बाहेर गेली होती. तेव्हा आरोपीने पीडितेवर बलात्कार करून तीचा दगडाने ठेचून खून केला. पीडितेची बहिण सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर तिला आपली मुकबधीर बहीण घरात आढळून आली नाही. शोधाशोध घेतली असता, जिल्हा परिषद हायस्कुलच्या मागील काटेरी झुडपात पिडितेचा मृतदेह आढळला.