नांदेड Girl Murder In Nanded : ऐन मकर संक्रातीच्या दिवशी सहा वर्षीय चिमुकलीचा खून करण्यात आल्यानं नांदेड जिल्हा हादरला आहे. क्रूर मारेकऱ्यांनी या चिमुकलीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या ओरडल्याचं मृतदेहावरुन स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुदखेड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली असून चिमुकलीचा मृतदेह शहराजवळ उमरी रोडवर सोमवारी आढळून आला आहे. या बालिकेच्या डोक्यावर गंभीर जखम असल्यानं पोलिसांनी खुनाचा संशय वर्तवला आहे.
काय आहे प्रकरण :मुदखेड तालुक्यातील एक सहा वर्षीय चिमुकली हरवली होती. या चिमुकलीच्या हरवल्याची तक्रार रविवारी मुदखेड पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास तिचा मृतदेह शहरानजीक उमरी रोडवर सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचं पुढं आलं आहे. त्यामुळं मुलीचा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.
सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता :मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून रविवारी दुपारी सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मुलगी कुठं आढळल्यास माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी 20 तासानं त्या बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह, रोही पिंपळगावपासून 15 किलोमीटर अंतरावर मुदखेड शहरालगत असलेल्या उमरी रोडवर आढळून आला. चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. सदर घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांकडून तपास मोहीम राबवण्यात येत आहे. घटनास्थळी भोकरचे अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यावरुन