नांदेड - नोकरीचे आमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार - Sumedh Bansode
नोकरीचे आमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्नाटकातील बोथी तांडा येथील मूळ रहिवासी असलेली तरुणी नवीन नांदेडमधील एका पब्लिक स्कूलमध्ये वॉर्डन पदावर कार्यरत आहे. या तरुणीला दुर्योधन आनंदा जाधव आणि किशन चव्हाण (दोघे रा. अहमदनगर) यांनी २५ एप्रिलला अहमदनगर येथे नेले. नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर २६ आणि २७ एप्रिलदरम्यान अत्याचार केला. या प्रकरणी युवतीने नांदेड ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली आहे.
तरूणीच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पंडित कच्छे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल कडू हे करत आहेत. या प्रकरणातील आरोपी गोरसेनेचे पदाधिकारी असल्याचेही तरुणीने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे