महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, त्यापूर्वी समाजाला न्याय मिळेल - गिरीश महाजन - Manoj Jarange Patil

Girish Mahajan On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी २० जानेवारी रोजी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिलाय. मात्र जरांगे पाटील यांच्यावर ती वेळ कधी येणार नाही, त्यापूर्वी समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय.

Girish Mahajan
गिरीश महाजन

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 9:50 PM IST

प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन

नांदेडGirish Mahajan On Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) सरकार वेगाने काम करत आहे. क्युरेटीव्ह पीटिशन मान्य झालं आहे. त्यातून आम्ही कोर्टाला पटवून देणार आहोत की, मराठा समाज मागास कसा आहे. शिवाय मागासवर्गीय आयोग देखील आपले काम करत आहे. त्यांचा रिपोर्ट आला की, आम्ही विधानसभेचे सत्र घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. सरकार प्रामाणिकपणे आणि वेगाने काम करत आहे. महिनाभरात हा प्रश्न मार्गी लागेल. दरम्यान मुंबईतील आंदोलनासाठी मराठा समाजाच्या बैठका सुरू आहेत. मात्र मराठा समाजाला मुंबईत येण्याची वेळ येणार नाही. तोपर्यंत या समाजाला न्याय मिळेल. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळेल, असं महाजन यांनी यावेळी सांगितलं.

हा आमच्यासाठी वादाचा विषय नाही :लोकसभेला अजित पवार गट शिंदे गट जागा मागत आहेत. यावर मंत्री गिरीष महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. तो प्रश्न वरिष्ठ स्तरावरचा आहे. दिल्लीलाच याबाबत ठरेल, त्यावेळेस दोन्ही पक्षाचे नेते, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे नेते त्याठिकाणी असतील. हा काही आमच्यासाठी वादाचा विषय नाही. आमच्यामध्ये अतिशय चांगल वातावरण आहे. सर्वच्या सर्व जागा आम्हाला जिंकायच्या आहेत. त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र आहोत, असं गिरीश महाजन म्हणाले.

संजय राऊतांकडून दुसरी अपेक्षा नाही: मोदी म्हणजे विष्णूचे तेरावे अवतार अशी टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलीय. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर दिलंय. 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू रामचंद्र मंदिरात विराजमान होणार आहेत. संपूर्ण देशात दिवाळीपेक्षा मोठा सण साजरा होणार आहे. म्हणून त्यांना पोटशूळ उठला आहे. त्यांच्या पोटात दुखणं साहजिक आहे. संजय राऊत हे वेगवेगळे कारण सांगत त्यांच्या बुध्दी प्रमाणे ते बोलत आहेत. आम्हाला आमंत्रण का नाही, मी हेच सांगतोय राष्ट्रीय पक्षांना आमंत्रण दिलं गेलं आहे. शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष नाही, तर राज्याचा देखील पक्ष राहिला नाही, असा चिमटा महाजनांनी काढला. केंद्राच्या सूचीमध्ये आहे, अशाच नेत्यांना तिथं बोलावण्यात आलं आहे. संजय राऊत हे शिवराळ भाषा वापरत आहेत. असं विचारलं असता, संजय राऊतांकडून दुसरी अपेक्षा नाही, त्यांनी जेवढा राजकारणातला स्थर घालवला तेवढा कोणीच घालवला नाही, असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

हेही वाचा -

  1. Girish Mahajan महाराष्ट्र मेडिकल सर्विस कमिशनकडून होणार वैद्यकीय पदांची भरती, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची घोषणा
  2. Mumbai High Court : गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम; कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश
  3. High Court Relief to Girish Mahajan : भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा कायम

ABOUT THE AUTHOR

...view details