महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरकुलासाठी नांदेड महापालिकेसमोर सत्याग्रह आंदोलन - नांदेडच्या बातम्या

शहरातील गोवर्धनघाट, श्रावस्तीनगर व सांगवी येथे बांधलेले गाळे रिकामे आहेत; परंतु बीएसयुपीचे घर रिकामे नाही, असे सांगितले जाते.

नांदेड सत्याग्रह
नांदेड सत्याग्रह

By

Published : Aug 4, 2020, 9:09 PM IST

नांदेड - घरकुल हक्काच्या विविध मागण्यांसाठी घरकुल हक्क संवर्धन समितीतर्फे महापालिका कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

समितीचे अध्यक्ष श्याम निलंगेकर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीएसयुपी योजनेअंतर्गत नांदेड शहरात बांधलेल्या पण रिकाम्या असलेल्या घरकुलांची संख्या ६४५ आहे. असे असताना उपायुक्त (विकास) यांनी घरकुल रिकामे नाहीत, असे पत्र देऊन व सर्वांचा विश्वासघात केला आहे.

दरम्यान, घरकुल हक्क संवर्धन समितीतर्फे घरकुल लाभधारकांना रिकामी व शिल्लक असलेली घरे देण्यात यावीत, या मागणीसाठी वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत; परंतु मागण्यांचा विचार न करता सोयीनुसार अर्थ काढून आमची व शासनाची दिशाभूल केली जात आहे.

शहरातील गोवर्धनघाट, श्रावस्तीनगर व सांगवी येथे बांधलेले गाळे रिकामे आहेत; परंतु बीएसयुपीचे घर रिकामे नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे खोटी, दिशाभूल करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून करून कारवाई करावी. लाभधारकांना घरकुलाचा ताबा द्यावा, या मागणीसाठी हे सत्याग्रह आंदोलन केल्याचे निलंगेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details