नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड ते पार्डी रस्त्यावर सकाळी नऊच्या सुमारास जिलेटीन घेऊन जाणाऱ्या गाडीचा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, सदरील गाडी जळून खाक झाली तर तुकडे सर्वदूर पसरले. तर स्फोट झालेल्या ठिकाणी दहा फुटाचा खड्डा पडला आहे.
मुदखेड जवळ जिलेटीनच्या गाडीचा भीषण स्फोट चार ते पाच किलोमीटर परिसरात मोठा आवाज -
जिल्ह्यातील मुदखेड शहरापासून पार्डी रस्त्यावर जिलेटीन घेऊन जाणारी गाडी पलटी झाली होती. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या रस्त्यावरील वाहतूक थांबवली. तसेच चालकही तातडीने बाजूला केले. यावेळी काही वेळातच भीषण असा स्फोट झाला. चार ते पाच किलोमीटर परिसरात मोठा आवाज झाला. तसेच स्फोट झालेल्या ठिकाणी दहा फूट खोल खड्डाही पडला आहे. त्यातच सदरील गाडीचेही सर्वत्र तुकडे पसरले. चारचाकी गाडी कोणची होती याचा शोध घेणे सुरू आहे. यात चालक किरकोळ जखमी झाला असून घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे.
हेही वाचा - दुचाकी-चारचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू