नांदेड -जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सर्वदूर पाऊस होत आहे. जिल्ह्यातील धर्माबाद महसूल मंडळात सर्वाधिक 85 मी.मी. पाऊस झाला आहे. माहूर तालूक्यातील सिंदखेडमध्ये (72 मिमी), वाई ( 68 मिमी), भोकर (66 मिमी) या चार मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे विष्णूपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाडाच्या सीमेवर पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे.
शहराला पाणी पुरवठा करणारे विष्णूपूरी धरण शंभर टक्के भरल्यामुळे त्याचा एक दरवाजा रविवारी रात्री उघडण्यात आला होता. मात्र, सकाळी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे तो पुन्हा बंद करण्यात आल्याची माहिती नियंत्रण अधिकारी अर्जुन शिंगरवाड यांनी दिली.