महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अशोक चव्हाणांच्या अधिपत्याखालील कारखान्याने थकविली एफआरपी; आंदाेलनाचा इशारा - मंत्री अशोक चव्हाण

सध्या उत्पादक यांच्यासह साखर कारखानदारीही अडचणीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीही बाकी आहे. ती ऑगस्ट पूर्वी देऊ असे आश्वासन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांनी दिली. कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके उपाध्यक्ष कैलास दाड कार्यकारी संचालक श्याम पाटील व इतर उपस्थित होते.

आंदाेलनाचा इशारा
आंदाेलनाचा इशारा

By

Published : Aug 10, 2021, 4:49 PM IST

नांदेड - सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या एफआरपी थकवली आहे. या एफआरपीच्या मागणीसाठी शिवसेना, प्रहार आणि संभाजी ब्रिग्रेड व शेतकऱ्यांनी कारखान्यात जाऊन चेअरमनला जाब विचारला. शेतकऱ्यांची असलेली थकबाकी 15 ऑगस्ट पूर्वी द्या अन्यथा मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची घोषणा संयुक्तरित्या तिन्ही संघटनांनी दिली आहे.

अशोक चव्हाणांच्या अधिपत्याखालील कारखान्याने थकविली एफआरपी

ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत...!

मंत्री चव्हाण यांच्या या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे चालू वर्षातील पन्नास कोटी आणि त्याचे व्याज थकले आहे तर मागील वर्षातील एफआरपी, ऊस लागवड प्रोत्साहन योजना आणि विलंब व्याज मिळून ही थकबाकी सवाशे कोटींच्या घरात आहे. सद्यस्थितीत शेतकरी आर्थिक अडचणीत असून खतपाण्याला आधार द्यावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी केली आहे.

...तर घरासमोर आंदोलन करू -

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने गत हंगामातील एफआरपीची ५० कोटी रुपये प्रतिटन ७०० प्रमाणे बाकी आहेत सदरील रक्कम कारखान्याने १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा स्वातंत्र्यदिनी कारखान्याची मुख्य प्रवर्तक तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरापुढे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान कदम प्रहारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजीराव कल्याणकर अर्धापूर तालुकाप्रमुख संतोष कपाटे माजी सरपंच राम कदम , बालाजीराव शिंदे ,उत्तमराव शिंदे , सुरेश शिंदे कासारखेडा ,माधव कदम विजय जाधव,देविदास इंगोले ,सुदामराव चौरे, संतोष कदम, रूखमाजी इंगोले तुकाराम आवर्दे, मारोतराव कदम, व्यंकटी कदम ,सुदामराव खानसोळे, ज्ञानेश्वर एडके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑगस्टपूर्वी रक्कम देऊ- गणपतराव तिडके

सध्या उत्पादक यांच्यासह साखर कारखानदारीही अडचणीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीही बाकी आहे. ती ऑगस्ट पूर्वी देऊ असे आश्वासन भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके यांनी दिली. कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके उपाध्यक्ष कैलास दाड कार्यकारी संचालक श्याम पाटील व इतर उपस्थित होते.

भाऊराव कारखान्याकडे असलेली थकबाकी...!

२०१३-१४ (FRP) ५.५ कोटी + व्याज

२०१३-१४ ऊस लागवड प्रोत्साहन योजना १० कोटी

२०१४-१५ (FRP)विलंब व्याज १५ कोटी

२०१६-१७ (RSF) २५ कोटी + व्याज

२०२०-२१ (FRP) ५० कोटी+ व्याज

एकूण बाकी

१०० कोटी + व्याज(अंदाजे) २० कोटी = १२५ कोटी रुपये शेतकऱ्यांचे बाकी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details