महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन पिझ्झा पडला तब्बल ८८ हजारांना, 'अशी' झाली फसवणूक - swiggy zomato

'झोमॅटो'च्या अॅपवरून सचिन पाटील यांनी पिझ्झा मागवला होता. त्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवूनही पिझ्झा आला नाही. अखेर त्यांनी याबाबत कस्टमर केअरकडे तक्रार नोंदवली होती.

pizza
ऑनलाईन पिझ्झा पडला तब्बल ८८ हजारांना, 'अशी' झाली फसवणूक

By

Published : Feb 12, 2020, 6:09 PM IST

नांदेड - शहरातील भाग्यनगर भागातील एका कंत्राटदाराला पिझ्झाची ऑर्डर करणे चांगलेच महागात पडले आहे. पिझ्झाच्या नावाखाली या कंत्राटदाराच्या खात्यातून तब्बल ८८ हजार ५०० रुपये लंपास करण्यात आले. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली.

हेही वाचा -विशेष रिपोर्ट: गडचिरोलीत बुरसटलेल्या मानसिकतेतून घडली सामूहिक आत्महत्या

सचिन पाटील यांनी 'झोमॅटो' अॅपवरुन पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यासाठी ऑनलाईन पैसेही पाठवले होते. परंतु, पिझ्झा आलाच नाही. त्यामुळे त्यांनी कस्टमर केअरकडे याबाबत तक्रार केली. ही तक्रार त्यांनी नोंदवून घेतली आणि एक लिंक पाठवून यूपीआय कोड आणि खात्यासंदर्भात इतर माहिती पाठविण्यास पाटील यांनी सांगितले. त्यानुसार माहिती पाठवताच पाटील यांच्या खात्यातून ८८ हजार ५०० रुपये वजा झाले. याप्रकरणी पाटील यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -रत्नागिरी: मनसे पाठोपाठ भाजपनेही केले बांग्लादेशींना लक्ष्य; गैरसमज पसरवत असल्याचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details