महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेड महापालिकेत अपहार; लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड महापालिका कर्मचारी अकबर खान उस्मान खान याच्याकडे मनपा हद्दीतील वसुलीचे काम देण्यात आले होते. त्याने १७ जून ते १० सप्टेंबर या काळात शहरातील रहिवाशांकडून वसुल केलेली १ लाख ८० हजार १०२ रुपयांची पाणीपट्टी मनपा कार्यालयात जमा केली नाही. याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जावेद अहेमद गुलाम एसदानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात अकबरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड महापालिकेत अपहार

By

Published : Sep 15, 2019, 11:25 AM IST

नांदेड- मनपा हद्दीत रहिवाशांकडून वसूल केलेल्या पाणीपट्टीच्या रकमेत अपहार झाला आहे. हा अपहार केल्याप्रकरणी एका वसुली लिपीकाविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महानगरपालिकेच्या हद्दीतील वसुलीचे काम येथील अकबर खान उस्मान खान याला देण्यात आले होते. तो मनपाचा कर्मचारी असन त्याने १७ जून ते १० सप्टेंबर या काळात शहरातील रहिवाशांकडून वसुल केलेली १ लाख ८० हजार १०२ रुपयांची पाणीपट्टी मनपा कार्यालयात जमा केली नाही. याबाबत मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जावेद अहेमद गुलाम एसदानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात अकबरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पन्हाळकर पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details