नांदेडमध्ये तोतया वन अधिकाऱ्यास अटक - नांदेड तोतया वन परिक्षेत्र अधिकारी बातमी
निवघा तालुका हदगाव येथे राहणारा कपिल पाईकराव नावाचा हा तोतया अधिकारी गेल्या काही दिवसांपासून लातूर फाटा, दूध डेअरी रोड येथे फिरत होता. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःकडे असलेले फिरते पथक ओळखपत्र दाखवले. ओळखपत्र व नावाची खात्री वनविभागात केल्यानंतर हा अधिकारी आमच्याकडे नाही, असे वन विभागकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
नांदेड - जिल्ह्यात तोतया वन परिक्षेत्र अधिकाऱ्यला लातूर फाटा परिसरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. कपिल पाईकराव अस तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडून वनविभागाचा लोगो असलेली दुचाकी आणि खाकी वर्दी पोलिसांनी जप्त केली आहे.
फिरते पथकाचे ओळखपत्र - मुळचा निवघा तालुका हदगाव येथे राहणारा कपिल पाईकराव नावाचा हा तोतया अधिकारी गेल्या काही दिवसांपासून लातूर फाटा, दूध डेअरी रोड येथे फिरत होता. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतःकडे असलेले फिरते पथक ओळखपत्र दाखवले. ओळखपत्र व नावाची खात्री वनविभागात केल्यानंतर हा अधिकारी आमच्याकडे नाही, असे वनविभागकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक तपास सुरू आहे.