नांदेड - शंकरनगर येथील विद्यालयातील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील चौथा आरोपी नराधम शिक्षक दयानंद राजुळेला बोड ठोकण्यात रामतीर्थ पोलिसांना यश आले आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक - नांदेड शंकरनगर लैंगिक शोषण प्रकरण आरोपी
काही दिवसांपूर्वी शंकरनगर येथील विद्यालयातील ४ शिक्षकांनी अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण केले होते. याप्रकरण रामतीर्थ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी दयानंद राजुळे अद्यापही फरार होता.

काही दिवसांपूर्वी शंकरनगर येथील विद्यालयातील ४ शिक्षकांनी अल्पवयीन मुलीच लैंगिक शोषण केले होते. याप्रकरण रामतीर्थ पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, मुख्य आरोपी दयानंद राजुळे अद्यापही फरार होता. रामतीर्थ पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखा पथक राजुळेला अटक करण्यासाठी त्याच्या मागावर होते. मात्र, राजुळे पोलिसांना गुंगारा देत होता. अकेर रामतीर्थ पोलिसांनी दयानंद राजुळेला लातूर रोडवरून बेड्या ठोकल्या. त्यामुळे आता शंकरनगर लैंगिक शोषण प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत.