नांदेड - येथील चंदासिंघ कॉर्नर येथील खतांची रिकाम्या बारदान भरलेल्या गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार गोदाम जळून खाक झाली आहेत. या गोदामात खतांचे बारदाने होते. ही आग कशी लागली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, प्राथमिक अंदाजनुसार शॉट सर्किटमुळे आग लागल्याची चर्चा सुरू आहे.
नांदेडमध्ये आगीत चार गोदाम जळून खाक; लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज - नांदेड आग
नांदेड येथील चंदासिंघ कॉर्नर येथील खतांची रिकाम्या बारदान भरलेल्या गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार गोदाम जळून खाक झाली.
नांदेडमध्ये आगीत चार गोदाम जळून खाक; लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच महापालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख रईस पाशा यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत उशीर झाल्याने लाखो रुपये किंमतीचे बारदाने जळून खाक झाली.