नांदेड : शिवसेनेकडून तीन वेळेस आमदार आणि एक वेळेस खासदार असलेल्या सुभाष वानखेडे ( Former MP Subhash Wankhede ) यांनी मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात धरला होता. परंतु, गेल्या अडीच वर्षांपासून त्यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नव्हते. त्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या नाट्यमय आमदार घडामोडीनंतर उत्तरचे बालाजी कल्याणकर पाठोपाठ हिंगोलीचे खासदार ( MP Hemant Patil ) हेही शिंदे गटात सहभागी झाल्याने वानखेडेंचा शिवसेना परतीचा मार्ग सुकर झाला होता. बुधवारी मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन बांधले.
Subhash Wankhede Criticized Hemant Patil : रस्त्यावर फिरणारा हेमंत पाटील 1000 कोटीचा माणूस कसा झाला - सुभाष वानखेडे
नांदेडचे सध्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे ( Former MP Subhash Wankhede ) यांनी बंडखोर खासदार यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. खासदार हेमंत पाटील ( MP Hemant Patil ) हे रस्त्यावर फिरत होते, त्यांना शिवसेनेने मोठे केले. आता ते दुसऱ्यांना शिकवत आहेत. द्रारिद्र्य रेषेखाली जगणारे हेमंत पाटील 1000 कोटीचे मालक ( Become a Man Worth Rs 1000 Crore ) कसे झाले? असा सवालही त्यांनी केला.
बंडखोर आमदार हेमंत पाटीलवर टीका : सुभाष वानखेडे यांची सेनेत येताच बंडखोर खासदार हेमंत पाटीलवर टीका. रस्त्यावरचा टुक्कार पोराला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठा केला आणि पार्लामेंटमध्ये पाठवले. हेमंत पाटील हा दारिद्र्यरेषेत राहत होता, आता 1000 कोटी रुपयांचा माणूस झाला ( Become a Man Worth Rs 1000 Crore ) कसा? असा प्रश्न हेमंत पाटील यांना केला. विनायक राऊतने पैसे मागितल्यावर तुम्ही तेव्हा का चूप होता. 12 वर्षे जिल्हाप्रमुख नांदेड दक्षिणचे आमदार असताना तेव्हा का शांत बसले. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बंडखोर खासदार हे राऊत आणि सेनेवर टीका करीत आहेत. आता लोकांना तुम्ही हे पण सांगा की, आम्ही पैसे घेऊन बंडखोरी केली. आता पक्षांनी जबाबदारी दिली आहे, बंडखोराला हदगाव हिमायतनगर विधानसभेसह हिंगोली जिल्ह्यात आम्ही गावबंदी आणणार आहे.