महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वलघ्या... वलघ्या...च्या गजरात शेतकऱ्यांनी केली वेळ अमावस्या साजरी - दर्शवेळा अमावस्या साजरी

नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील कर्नाटक सीमेलगत असलेल्या तालुक्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. 'येळ्ळ अमावस्या' हा मूळ कानडी शब्द आहे.

वेळ अमावस्या साजरी
वेळ अमावस्या साजरी

By

Published : Dec 25, 2019, 9:40 PM IST

नांदेड -वेळ आमावस्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा खास सण आहे. वर्षातली सातवी अमावस्या ही 'वेळ अमावस्या' म्हणून साजरी केली जाते. शेतात किंवा निसर्गाच्या सान्निध्यात हा दिवस उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.

वेळ अमावस्या साजरी


नांदेड आणि लातूर जिल्ह्यांतील कर्नाटक सीमेलगत असलेल्या तालुक्यात मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. 'येळ्ळ अमावस्या' हा मूळ कानडी शब्द आहे. याचाच अपभ्रंश होऊन 'वेळ अमावस्या' शब्द रुढ झाला.

हेही वाचा - अर्धापुरातील अग्निशमन दलाच्या इमारतीची चौकशी गुलदस्त्यात; चार महिन्यापासून चौकशी रखडली

रब्बी हंगामाच्या काळात ही अमावस्या येते. कडब्यापासून तयार केलेल्या खोपीमध्ये शेतात असणाऱ्या सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पांडवांची(काही भागामध्ये याला लक्ष्मीपूजा देखील म्हणतात) पूजा केली जाते. एका रंगवलेल्या माठामध्ये आंबील भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवून शेतात खोपीवर आणले जाते. वलघ्या.. वलघ्या.. असा जयघोष केला जातो. यासाठी नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रण दिले जाते.


ज्वारी आणि बाजरीच्या पिठाचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली भजी, खीर, आंबील या पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनवलेल्या सर्व पदार्थांचे प्रसाद वाटप केले जाते. लहान मुले या दिवशी पतंग उडवणे, झोका खेळणे यासारखे खेळ खेळतात.

ABOUT THE AUTHOR

...view details