महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती....! - माधवराव कदम

कोरोनापासून बचावासाठी गीत रचना करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ प्रसारित करत आहे. जनजागृतीसाठी माझ्या परीने हातभार लावत आहे. अशी भावना लोककलावंत माधवराव कदम यांनी व्यक्त केली आहे.

folk-artists-enlightens-people-about-care-from-corona
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती....!

By

Published : Apr 9, 2020, 9:02 AM IST

Updated : Apr 9, 2020, 3:03 PM IST

नांदेड- लोककला हे जनजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. अनेक वेळा शासकिय योजनांचा प्रचार प्रसार ही या लोककलावंताच्या माध्यमातून प्रभावीपणे केला जातो. कोरोनाच्या या महाभयंकर साथीच्या काळात जनजागृती खूप महत्वाची आहे. कोरोनाच्या या कठीण काळात जनजागृती करण्यासाठी देखील मागे नाहीत. कोंढा तालुका अर्धापूर येथील माधवराव गणपतराव कदम आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात लोककलेच्या माध्यमातून जनजागृती....!

आजच्या घडीला ग्रामीण भागातही लोककलेला मानणारा वर्ग आहे. तसेच जुने कलावंतही आहेत. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी मी पुढाकार घेतला आहे. कोरोनापासून बचावासाठी गीत रचना करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ प्रसारित करत आहे. जनजागृतीसाठी माझ्यापरीने हातभार लावत आहे. अशी भावना लोककलावंत माधवराव कदम यांनी व्यक्त केली आहे.

लोककला या संबंधित संस्कृतीच्या प्रवाहक असतात. त्या लोककलांमधून लोकजीवन, लोकसमूह आणि त्या लोकसमूहाच्या परंपरा, रुढी यांचे प्रतिबिंब उमटत असते. लोकसमूहाचे सांस्कृतिक आणि धार्मिक भावविश्वाचे दर्शनही या लोककलांमधून घडत असते. आधुनिक प्रसारमाध्यमांच्या काळात या लोककला शेवटच्या घटका मोजत असल्या तरी काही लोककलावंत आजही आपली कला जनतेसमोर सादर करून जनजागृती करण्याचे काम करतात. हे कार्य चिरंतन टिकणार आहे, असे मत ग्रामीण लेखक प्रा.आत्माराम राजेगोरे यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राला लोककलेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. पूर्वी पहाटेच्या प्रहरी रामनामाचा महिमा गात वासुदेव आला की, त्याची ललकारी कानावर पडायची. मग लोकांची सकाळ उजाडत असे. दिवसभराच्या कष्टाने दमलेल्या माणसांची पावले सायंकाळ झाल्यावर देवळाकडे वळायची. भजन आणि कीर्तनात रंगणारी ती माणसे कधीकधी कीर्तन, भारुडातील प्रसंगांनी हसू लागायची, तमाशा, लावणीने देहभान हरपून जायची, शाहीरांचे पोवाडे अंगावर शहारे उभे करायचे. कष्टाने, दुःखाच्या क्षणांनी भांबावलेल्या मराठी माणसाला आपल्या कलांद्वारे मोहित करण्याची किमया साधणाऱ्या या लोककला आहेत. काही लोककला आता लोप पावत असल्यातरी त्यांमध्ये समाज प्रबोधन करण्याचे मोठी क्षमता आहे.

गोंधळ, जागरण, तमाशा, लावणी, भजन, कीर्तन, दशावतारी खेळ, भारूड, खडी गंमत, दंडार या काही प्रमुख लोककलांनी महाराष्ट्रातील ग्रामीण माणसाचे मनोरंजन केले. त्या जोडीला वासुदेव, पिंगळा, बहुरूपी, भुत्या, नंदीबैलवाला, शाहीर, सुंबरान गाणारे धनगर, पोतराज, यांनीही मराठी माणसाचे जीवन समृद्ध केले.

Last Updated : Apr 9, 2020, 3:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details