महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीच्या धडकेने पाच जण जखमी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नांदेडच्या दौऱ्यावर

नांदेड - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांनी धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना गडगा- मुखेड रोडवरील बेळी फाटा घडली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात पाच जण जखमी
देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात पाच जण जखमी

By

Published : Oct 4, 2021, 9:42 AM IST

नांदेड - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांनी धडक दिल्यामुळे पाच जण जखमी झाल्याची घटना गडगा- मुखेड रोडवरील बेळी फाटा घडली आहे.

पाच जण झाले जखमी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नांदेडच्या दौऱ्यावर होते. मुखेड तालुक्यातील बेरळी फाटा येथे राजे छत्रपती अकॅडमीजवळ ताफ्यातील वाहनाने एका पोलीसासह दोन मोटरसायकल आणि एका मालवाहू जीपला धडक दिली. या घटनेत पाच जणांना दुखापत झाली असून, बालाजी पवार, राजेश जाधव, जमादार नामदेव दोसलवार, समीर भिसे व अरविंद मोरे अशी त्यांची नावे आहेत.

आघाडी सरकारवर आरोप

नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरिप हंगामातील सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना आता तातडीची अर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. खरीप पिकासोबतच केळी, ऊस, हळद बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या भागाची नुकतीच पाहणी केली. दरम्यान, त्यांनी शासनाकडून मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही व आमचा पक्ष नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र, यासाठी राज्यातील तीन पक्षाचे आघाडी सरकार फक्त पोकळ घोषणा करत असल्याचा आरोप केला आहे.

(दि. २ ऑक्टोब)रोजी सायंकाळी मराठवाडा दौऱ्यावर होते

मागील आठवड्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेले संपूर्ण पिके उध्दवस्त झाली. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दि. २ ऑक्टोब)रोजी सायंकाळी मराठवाडा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, नांदला - दिग्रस येथील पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

हेही वाचा -फडणवीसांनी पूरग्रस्त दौऱ्यात पक्षीय राजकारण साधले, सामनाच्या आग्रलेखातून विरोधी पक्षाला शालजोडे

ABOUT THE AUTHOR

...view details