महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडमध्ये आणखी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - नांदेड कोरोना केसेस

नांदेडमध्ये रविवारी ५ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्ण संख्या ४२८ वर पोहोचली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोसीकर यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

nanded corona news
नांदेड कोरोना न्यूज

By

Published : Jul 6, 2020, 8:11 AM IST

नांदेड- जिल्ह्यात कोरोनामुळे मागील दोन दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला तर रविवारी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भोसीकर यांनी केले आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२८ वर पोहोचली आहे.

देगलूर येथील ५७ वर्षीय व्यक्ती कोरोना उपचारासाठी शुक्रवारी दवाखान्यात दाखल झाला होता. शनिवारी त्यांचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि रविवारी त्यांचा मृत्यू झाला. ईदगाह रोड बिलोली येथील एक ६५ वर्षीय महिला शुक्रवारी उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालापैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १२ अहवाल निगेटिव्ह आले तर ३ स्वॅब अनिर्णित ठेवण्यात आले आहेत. शनिवारी मरण पावलेल्या ईदगाह रोड बिलोली येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवार पेठ, हिंगोली येथील एक ४५ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे. तर हबीबीया कॉलनी इतवारा येथील २४ वर्षीय महिला तसेच इसापूर येथील ५९ वर्षीय पुरुष , उमर कॉलनी देगलूरनाका येथील ३२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित झाला आहे.

जिल्ह्यात रविवरपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४२८ वर पोहोचली होती. २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, नागरिक विनाकारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरताना दिसून येत आहेत.नागरिकांनी स्वतःहुन दक्षता घेऊन सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, नेहमी स्वच्छ हात धुणे हे उपाय करावेत,असे अवाहन आरोग्य विभागाच्यावतीने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details