नांदेड :हिमायतनगर तालुक्यातील करंजी फाटा येथे आज शनिवार दि २४ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ट्रक आणि आयचर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. यात बिहारचे पाच मजूर ठार झाले आहेत, तर चार जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे.
Terrible Accident : बिहारचे 5 मजूर अपघातात ठार, 4 गंभीर जखमी हिमायतनगर तालूक्यातील घटना - five killed in accident
Terrible Accident : बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या पाच कामगारांवर नांदेडमध्ये काळाने घाला घातला. अपघातात पाच कामगारांचा मृत्यू झालाय.
बिहार राज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या पाच कामगारावर हिमायतनगर तालुक्यात करंजी फाट्याजवळ काळाने घाला घातला. मयत व जखमी सर्व रेल्वेच्या कामासाठी हिमायतनगर परिसरात वास्तव्यास होते. आज रात्री आठच्या सुमारास ते आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना त्यांच्या आयचर टेम्पोला सिमेंट नेणाऱ्या ट्रकने धडक दिली.
या धडकेत आयचरमधील पाच कामगार जागीच ठार झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक भूशनर यांच्यासह आदी पोलीस अधिकाऱ्यांनी व महसूल अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.