महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला बिलोली न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सय्यद रसुल असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. आरोपी शिक्षक सय्यद रसूल याला २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती.

सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार
सहावीतील विद्यार्थिनीवर अत्याचार

By

Published : Jan 23, 2020, 10:21 PM IST

नांदेड -बिलोली तालुक्यातील एका शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला बिलोली न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सय्यद रसूल असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याने सहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता.

हेही वाचा - निर्भया प्रकरण : तुरुंग प्रशासनाने दोषींना विचारली शेवटची इच्छा
आरोपी शिक्षक सय्यद रसूल याला २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यानंतर त्याला रामतीर्थ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. रामतीर्थ पोलिसांनी गुरुवारी (२३ जानेवारी) सय्यद रसूलला बिलोलीच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी शिक्षक अद्याप फरार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details