महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Petrol Pump Robbing : मराठवाडा-विदर्भात पेट्रोलपंपाची कॅश लुटणाऱ्या पाच आरोपींना अटक; अर्धापूर पोलिसांची कामगिरी - पेट्रोलपंपाची कॅश लुटणाऱ्या पाच आरोपींना अटक

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव-वसमत महामार्गावरील पद्मावती पेट्रोल पंपाची कॅश लुटण्याचा ( Petrol Pump Robbing ) प्रयत्न केला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना अर्धापूर पोलिसांनी एक महिन्याच्या आत तपास करूना सापळा रचून वसमत तालुक्यातून अटक ( Five accused arrested for robbing petrol pump ) करण्यात आली आहे. या आरोपींनी मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पेट्रोलपंपावर दरोडा टाकून पैश्याची लूट केली आहे.

Petrol Pump Robbing
पेट्रोलपंपाची कॅश लुटणाऱ्या पाच आरोपींना अटक

By

Published : Apr 4, 2022, 6:09 PM IST

नांदेड - अर्धापूर तालुक्यातील मालेगाव-वसमत महामार्गावरील पद्मावती पेट्रोल पंपाची कॅश लुटण्याचा ( Petrol Pump Robbing ) प्रयत्न केला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना अर्धापूर पोलिसांनी ( Ardhapur Police ) एक महिन्याच्या आत तपास करूना सापळा रचून वसमत तालुक्यातून अटक ( Five accused arrested for robbing petrol pump ) करण्यात आली आहे. या आरोपींनी मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात पेट्रोलपंपावर दरोडा टाकून पैश्याची लूट केली आहे. अर्धापूर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

मालेगाव रोडवर पेट्रोल पंपची कॅश लुटण्याचा प्रयत्न - अर्धापूर-वसमत या महामार्गावरील मालेगाव येथील पद्मावती पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक दादाराव अशोक हाके हे दि. १४ मार्च रोजी पेट्रोल विक्रीतून जमा झालेले रूपये ९ लाख ५४ हजार २२० एवढी रक्कम मालेगांव येथील बँकेत जमा करण्यासाठी जात असतांना धामदरी पाटील जवळ अज्ञात तीन चोरटय़ांनी एका मोटार सायकलवरून पाठलाग करून दादाराव हाके यांचे मोटार सायकलला पाठीमागुन लाथ मारुन त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला व त्याचे जवळ असलेली ९ लाख ५४ हजार २२० रूपयांची बॅग हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेप्रकरणी अर्धापुर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६०/ २०२२ कलम ३९३ भादंवि. प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अर्धापूर पोलिसांनी बजावली कामगिरी -या प्रकरणी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अर्चना पाटील यांनी सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या त्यावरुन अर्धापुर पोलीस स्टेशन ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी स्वतः गांभीर्याने व तत्परतेने घटनास्थळाला भेटी देऊन गोपनिय माहिती घेतली व त्यांनी स्वतः गुप्त व खात्रीशिर माहितीचे आधारे तपासाची चक्रे गतिमान करून यातील आरोपी हे हिंगोली जिल्हयातील वसमत तालुक्यात कंरजी येथे असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांचे दोन वेगवेगळे पथक तयार करुन पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासह पोलीस उप निरीक्षक कपिल आगलावे, साईनाथ सुरवसे, पोलीस नाईक राजेश घुन्नर, संजय घोरपडे, होमगार्ड दिपक बल्लोड, सर्जेराव मुंगल हे सर्वजण त्या ठिकाणी गेले असता आरोपी हे पोलीसांना पाहुन पळ काढत होते. त्यांचा पाठलाग करुन १) सर्जेराव रोहिदास होळपदे वय - २२ वर्षे रा. कंरजी ता. वसमत २) देवानंद उर्फ लखन बालाजी दुधमागरे वय २१ वर्षे रा. खांडेगांव ता. वसमत ३) पवन माणिकराव डाकोरे वय २१ वर्षे रा. पळसगांव ता. वसमत ४) गोविंद उर्फ अतुल रमेश तुरेराव वय २३ वर्षे रा. खांडेगांव ता. वसमत ५) राजु एकनाथ चव्हाण रा. खांडेगांव ता. वसमत या पाच आरोपींना शुक्रवारी पकडून अटक केली.

मराठवाडा-विदर्भात दरोडा -या आरोपींना ताब्यात घेऊन पद्मावती पेट्रोल पंप चोरी प्रकरणी सखोल चौकशी केली असता त्यांनी मालेगांव ते वसमत रोडवर पद्मावमी पेट्रोल पंपाचे ९ लाख ५४ हजार २२० रुपये जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. यावेळी या आरोपींकडुन गुन्ह्यात वापलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. तसेच सदर गुन्हयातील आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी लिंबगांव पोलीस ठाणे हद्दीतील निळा येथील वैशालीताई पावडे पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली, वाशिम जिल्ह्य़ातील आसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील बिटोळा भोयर येथील आंनदी पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली, मानवत पोलीस ठाणे हद्दीतील रूद्री पाटी जवळ कैलास पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली, महागव पोलीस ठाणे हद्दीतील पेट्रोल पंपावर जबरी चोरी केली तसेच वरिल सर्व पेट्रोल पंपावर जबरी चोरी करुन फरार झाल्याचे सांगुन वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक -अशा अट्टल चोरट्यांना पकडून गजाआड केल्याबद्दल अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, उपनिरीक्षक कपिल आगलावे, साईनाथ सुरवसे, पोलीस नाईक राजेश घुन्नर, संजय घोरपडे, होमगार्ड दिपक बल्लोड, सर्जेराव मुंगल यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी या कामगीरीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा -Alternative Fuel Council Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पुण्यातील पर्यायी इंधन परिषदेचे कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details