महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dinesh Hanwante : राज्यातील तृतीयपंथीयाचा पोलीस भरतीचा पहिला अर्ज दाखल - Transgender Dinesh Hanwante policeman

राज्यात पहिला तृतीयपंथीय पोलीस बनण्याच्या मार्गावर ( First Transgender apply for Police ) आहे. तृतीयपंथी दिनेश हणवंते याने पोलीस भरतीचा फॉर्म (Transgender Dinesh Hanwante Police Form) भरला आहे. मल फाउंडेशनने यात त्याला भरपूर मदत केली.

First Transgender Police too be
पहिल्या तृतीयपंथीयाचा पोलीस भरतीचा अर्ज दाखल

By

Published : Dec 16, 2022, 8:23 PM IST

पहिल्या तृतीयपंथीयाचा पोलीस भरतीचा अर्ज दाखल

नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सामाजिक वातावरणातून बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या घटकाला म्हणजेच तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने पोलीस ( First Transgender apply for Police ) भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथीयांना सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर गुरुवारी शेवटच्या दिवशी उच्चशिक्षित असलेल्या व सध्या MPSC ची तयारी करणाऱ्या दिनेश हणवंते या तृतीयपंथीयाने पोलीस होण्याची इच्छा व्यक्त केली. हा तृतीयपंथी नांदेड शहराजवळ असलेल्या पांगरी या गावाचा रहिवासी( Transgender Dinesh Hanwante policeman ) आहे.

तृर्तीयपंथाचे प्रमाणपत्र नाही : मात्र,दिनेश हणवंते यांनी तृर्तीयपंथाचे प्रमाणपत्र नसल्याने फॉर्म भरण्याचे टाळले होते. फॉर्म भरण्याची जिद्द असल्याने आणि अखेर त्यांनी सर्व कागदपत्रे जमा केली. या प्रमाणपत्रासाठी शेवटचा दिवस असल्याने तृर्तीयपंथीयांवर काम करणार्‍या कमल फाउंडेशनने त्याला फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या सर्वच कागदपत्रांची पूर्तता केली. अखेर शेवटच्या दिवशी सायंकाळी त्याचा पोलीस भरतीसाठी फॉर्म भरून घेतला. हा मराठवाड्यातील पहिल्याच तुर्थीयपंथीयाचा पोलीस भरतीचा अर्ज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.दिनेश हा उच्चशिक्षित असून त्याचे समाजशास्त्र या विषयात (M.A.) झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहे.



राज्य सरकारचे दिनेशने मानले आभार : महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय तृतीयपंथीयांसाठी प्रेरणा देणारा निर्णय आहे. समाजामध्ये दोनच लिंग आहेत असे आपण समजतो. पण तृतीयपंथी हे देखील समाजाचा एक घटक असून तिसरे लिंग आहे. राज्य शासनाने सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्हाला स्थान मिळवून दिलं आहे, त्याबद्दल आम्ही राज्य शासनाचे आभार मानतो. समाजामध्ये आम्हाला देखील चांगली वागणूक मिळावी. आम्ही देखील समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्र शासनाने आम्हाला जी काही संधी दिली आहे, त्या संधीच आम्ही नक्कीच सोनं करू, अशी प्रतिक्रिया दिनेशने यावेळी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details