नांदेड -शहरात भरदिवसा भरदिवसा गोळीबार करुन व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. शहरातील जुना मोंढा परिसरात ही घटना घडली. दोन दुचाकीवर येऊन सहा जणांनी परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार करत ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला.
नांदेडमध्ये पुन्हा थरार; भरदिवसा गोळीबार करुन व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न - nanded firing
नांदेड शहरात गोळीबाराच्या घटना घडतच आहेत. रविवारीदेखील त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. जुना मोंढा भागातील व्यापाऱ्यावर गोळीबार करत लुटण्याचा प्रयत्न झाला. दोन दुचाकीवर येऊन सहा जणांनी परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार करत ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला.
शहरात गोळीबाराच्या घटना घडतच आहेत. रविवारीदेखील त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. जुना मोंढा भागातील व्यापाऱ्यावर गोळीबार करत लुटण्याचा प्रयत्न झाला. दोन दुचाकीवर येऊन सहा जणांनी परिसरात व्यापाऱ्यावर गोळीबार करत ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. नुकताच पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची पदभार स्वीकारला आहे.
नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या तरीही पुन्हा पुन्हा गोळीबाराच्या घटना घडतच आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नुकतेच नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे उपाययोजना करतील का? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.