महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 9, 2021, 5:35 PM IST

ETV Bharat / state

सिनेस्टाईल पाठलाग करत तरुणावर गोळीबार; मुखेड तालुक्यातील निवळी येथील घटना

मुखेड तालुक्यात मंगळवारी (दि.9) दुपारी एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. यात तिरुपती पपुलवाड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

Firing at youth in Nanded district
तिरुपती पपुलवार

नांदेड- नांदेडात गोळीबाराच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीये. मंगळवारी (दि.9) दुपारी मुखेड तालुक्यात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. यात तिरुपती पपुलवाड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे पूर्वी नांदेड शहरापूरती मर्यादित असलेली गुंडगिरी आता ग्रामीण भागात देखील पसरत असल्याचे दिसत आहे.

सिनेस्टाईल पाठलाग करत गोळीबार

मुखेड तालुक्यातील निवळी शिवारात गोळीबार झाला. बाऱ्हाळी ते वडगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर गणपती मंदिराजवळ ही घटना घडली आहे. मोटरसायकलीवरून सिनेस्टाईला पाठलाग करत तिरुपती पपुलवार या तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत तिरुपती गंभीर जखमी झाला आहे.

अज्ञात व्यक्तीने केला हल्ला

मुखेड तालुक्यातील निवळी येथील तरुण तिरुपती राणबा पपुलवार हे देगलूर येथून निवळीकडे येत होते. मात्र, मोटारसायकलवरून आलेल्या आलेल्या अज्ञात व्यक्तीने पाठलाग करत गोळ्या झाडायला सुरुवात केली. नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. या घटनेत तिरुपती पपुलवार यांच्या पाठीत उजव्या खांद्याला गोळी लागली आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले. गोळी लागल्यानंतरही त्यांनी आपली दुचाकी न थांबवता बाऱ्हाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाले.

गोळीबाराचा पेव ग्रामीण भागात देखील.?

मागील काही वर्षांत नांदेडात खून, दरोडा आणि लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नांदेडकरांसाठी गुन्हेगारी आणि गोळीबाराच्या घटना काही नवीन राहिल्या नाही. दर दिवशी कुठेना कुठे देशी कट्टे हस्तगत केले जात आहेत. यापूर्वी नांदेड शहरापुरत्या मर्यादित होत्या. मात्र, मुखेड तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे आता गुन्हेगारीचे पेव ग्रामीण भागात देखील पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा -कौतुकास्पद! कोरोनाच्या आव्हानात्मक काळात 1 हजार 54 मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया

हेही वाचा -पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मांजरा नदीत बुडून मृत्यू; दोघेही तेलंगणातील रहिवासी

ABOUT THE AUTHOR

...view details