नांदेड -हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या पळसपूर रस्त्याच्या कडेला गहू, हरभरा पिकाची काढणी झाल्यानंतर रस्त्यावरून जात असलेल्या हार्वेस्टरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. मुख्य रस्त्यावर पेट घेतल्यामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
Video: नांदेडमध्ये गहू काढण्यासाठी आलेले हार्वेस्टर रस्त्यावरच जळून खाक - गहू काढणी हार्वेस्टर
हिमायतनगर ते पळसपूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शेतकऱ्याच्या शेतातील गहू काढण्यासाठी आलेल्या हार्वेस्टरला रस्त्यावरून जाताना आग लागली.
हेही वाचा -VIDEO : शरद पवारांनी मानले अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे आभार..
हिमायतनगर ते पळसपूर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका शेतकऱ्याच्या शेतातील गहू काढण्यासाठी तेलंगानातून आलेले हार्वेस्टर दिवसभर चालूच होते. गहू काढणी झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता हार्वेस्टर परत जाताना मुख्य मार्गावर हार्वेस्टरच्या वायरींगमुळे अचानक आग लागली. आगीत हार्वेस्टर चालक थोडक्यात बचावला आहे. या आगीमुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. संबंधीत घटनेची माहिती हिमायतनगर पोलिसांना कळताच अग्निशमनाची गाडी तत्काळ पाठवून सदरील आग विझविण्यात आली आहे. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली आहे.