महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दैव बलवत्तर म्हणून वाचले पन्नास भाविकांचे प्राण!

मुंबई येथील महिला भाविकांना माहूर गडावर घेऊन जाणाऱ्या धावत्या बसच्या चाकाने पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, चालकाने प्रसंगावधान बाळगत माहूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला तत्काळ संपर्क साधला.

बसला लागलेली आग विझवताना
बसला लागलेली आग विझवताना

By

Published : Dec 29, 2019, 10:37 PM IST

नांदेड - माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थानाजवळ धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.

बसला लागलेली आग विझवताना


नाताळाच्या सुट्ट्या असल्याने तीर्थक्षेत्र माहूर येथे भाविकांची गर्दी होत आहे. मुंबई येथील महिला भाविकांना घेऊन एक खासगी बस माहूर गडावर जात होती. अचानक धावत्या बसच्या चाकाने पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मात्र, चालकाने प्रसंगावधान बाळगत माहूर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला तत्काळ संपर्क साधला.

हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टेम्पोला अपघात; 3 ठार 1 गंभीर जखमी

नगर पंचायतीचा अग्निशामक बंब काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाला. यानंतर चालक मन्सूर शेख, स्वच्छता दूत गणेश जाधव आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details