महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकबर चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल - child nude video on social media

गुरुपेजसिंग, जैशनखान, मुकेश शर्मा, मारवान यमन यांनी २४ ऑगस्ट २०१८ ते ४ मे २०१९ या काळात फेसबुकवर लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ, फोटो अपलोड करून व्हायरल केले होते.

nanded police
नांदेड पोलीस

By

Published : Feb 6, 2020, 11:22 PM IST

नांदेड - लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी चार आरोपींविरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकबर चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल.

याबाबत माहिती अशी, की गुरुपेजसिंग, जैशनखान, मुकेश शर्मा, मारवान यमन यांनी २४ ऑगस्ट २०१८ ते ४ मे २०१९ या काळात फेसबुकवर लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ, फोटो अपलोड करून व्हायरल केले होते.

नांदेड सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश आलीवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुरुपेजसिंग, जैशनखान, मुकेश शर्मा, मारवान यमन यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप शिवले हे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details