नांदेड - भोकर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून पंधरा हजाराची लाच मागणाऱ्या भोकर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक नागोराव आत्राम याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्यावर भोकर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला होता.
पंधरा हजारांची लाच मागणाऱ्या उपनिरीक्षकांवर भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा - नांदेड पोलीस उपनिरीक्षक लाच स्वीकारणे बातमी
लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड कार्यालयाकडून पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यात सहायक पोलीस उपनिरीक्षक नागोराव गोविंदराव याने लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे आत्राम यांच्याविरूद्ध भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारावरील गुन्ह्यात मदत करण्यासाठी पंधरा हजाराची लाच द्यावी, अशी मागणी येथील सहायक पोलीस उपनिरीक्षक नागोराव आत्राम हे करत होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नांदेड कार्यालयाकडून पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यात सहायक पोलीस उपनिरीक्षक नागोराव गोविंदराव याने लाच घेण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे आत्राम यांच्याविरूद्ध भोकर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.