नांदेड - बनावट सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरुन मध्यप्रदेशातील सारस अॅग्रो कंपनीविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतात सोयाबीनचे बियाणे खरेदी करुन पेरणी केली होती. यावेळी समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही सोयाबीनचे पिक उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
पेरलेले सोयाबीन उगवलंच नाही.. मध्यप्रदेशच्या 'सारस' सिड्स कंपनीविरुद्ध धर्माबाद पोलिसात गुन्हा दाखल - नांदेड न्यूज
बनावट सोयाबीन बियाणे विक्रीप्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरुन मध्यप्रदेशातील सारस अॅग्रो कंपनीविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतरही सोयाबीनचे पिक उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुबारा पेरणीचे संकट ओढावले आहे. मराठवाडा, विदर्भात बनावट बियाणांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे निष्पन्न झाले. लोकप्रतिनिधींनी शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी केली आहे. बनावट बियाणे विकणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. यापूर्वीही शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्यात सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. धर्माबाद पंचायत समितीचे कृषी विकास अधिकारी विश्वास अर्धापूर यांच्या तक्रारीवरुन आता सारस अॅग्रो इंडस्ट्रीज खांडवा, (मध्यप्रदेश) कंपनी व यवतमाळ येथील कंपनीचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र गुलकरी यांच्याविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.