महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Food Poisoning : पाणीपुरी खाणे पडले महागात; तब्बल 57 जणांना विषबाधा - पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा

नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांना पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झाली. लहान बालकासह गावातील तब्बल 57 जणांना हि विषबाधा झाली असून त्यामुळे गावात एकच खळबळ उडालीय. गावात नेहमीच लावण्यात येणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ल्याने ही विषबाधा झालीय. या सर्व रुग्णांवर गावात उपचार करण्यात आले असून काही जणांना नांदेडला हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Poisoned Eating Panipuri
Poisoned Eating Panipuri

By

Published : Apr 15, 2023, 9:09 PM IST

अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांना पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा

नांदेड :अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांना पाणीपुरीतून विषबाधा झाली. लहान बालकासह तब्बल ५७ जणांना हि विषबाधा झाली असून एकच खळबळ उडाली. गावात नेहमीच हा पाणीपुरीचा गाडा गेल्या अनेक वर्षांपासून लावला जातो. आलूच्या भाजीतून ही विषबाधा झाल्याचा अंदाज असून सर्व रुग्णांवर गावात उपचार करण्यात आले असून काही जणांना नांदेडला हलविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते. पाणीपुरी खाल्यानंतर सर्वांना मळमळ, उलट्या, अतिसार सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने चाभरा, अर्धापूर, नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

ग्रामीण रुग्णालय हलवले : १४ एप्रिल रोजी चाभरा गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरी खाल्ली होती. परंतु १५ एप्रिल रोजी सकाळी मळमळ, उलट्या होण्यास सुरुवात झाली. काही जणांना उलट्या अतिसार सुरू झाल्याने गावकरी घाबरून गेले. काही जणांना उलट्या, अतिसाराचे प्रमाण वाढल्याने त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

अनेकांनी पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा :पाणीपुरीवाल्याकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झालेल्यांची संख्या मोठी आहे. यात लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आज सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाभरा येथे येऊन पाहणी केली. तसेच पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीकडून पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. संदेश कदम, डॉ. जनार्धन टारफे, डॉ. मुस्तपुरे, आरोग्य सेविका टरके, सतीश जाधव आदींनी गावातील सर्व विषबाधित रुग्णांची तपासणी केली. चाभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४७, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात ८, नांदेड येथे खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहे. यामध्ये ११ लहान मुले आहेत तर ४६ मोठ्या व्यक्तीचा समावेश आहे. यात महिला, पुरुषही आहेत.


हेही वाचा - Pulwama Attack : पुलवामा हल्ला, सर्वात स्फोटक मुलाखत 'ईटीव्ही भारत'वर; सत्यपाल मलिक म्हणाले, 'मोदींनी त्यावेळी..'

ABOUT THE AUTHOR

...view details