नांदेड- मालेगाव रोडवरील बंद खासगी शाळेच्या एका वर्गात प्रतिबंधित गुटख्याचा साठा केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची कुणकुण लागताच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २० जून रोजी धाड टाकून विविध कंपन्यांचा पावनेतीन लाख रुपयांचा गुटखासाठा जप्त केला. या प्रकरणी एकास ताब्यात घेतले असून भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगद अशोक पवार असे आरोपीचे नाव आहे.
नांदेड : खासगी शाळेच्या बंद खोलीत भरवला गुटख्याचा बाजार...
कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून मालेगाव रोडवरील स्टेट बँकेलगत असलेल्या एका बंद शाळेची वर्गखोली गुटखा व्यावसायिकाने भाडेतत्वावर घेतली होती. गोळया-बिस्कीटचा व्यवसाय करायचा असल्याची बतावणी करून त्याने ही शाळेची खोली भाड्याने घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे तीन लाखांचा गुटखा जप्त केला.
कोरोनामुळे सध्या शाळा बंद असून मालेगाव रोडवरील स्टेट बँकेलगत असलेल्या एका बंद शाळेची वर्गखोली गुटखा व्यावसायिकाने भाडेतत्वावर घेतली होती. गोळया-बिस्कीटचा व्यवसाय करायचा असल्याची बतावणी करून त्याने ही शाळेची खोली भाड्याने घेतली होती.
सध्या लॉकडाऊन काळात पानपट्टी उघडण्यास परवानगी नाही, असे असले तरीही गुटखा, सुगंधीत तंबाखू व अन्य साहित्य ग्राहकांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा जिल्ह्यात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सक्रीय आहे. त्याच पद्धतीने या व्यावसायिकांना माल सप्लाय करण्यासाठी आरोपीने मालेगाव मार्गावरील खोलीत गुटखा साठवला होता. याची कुणकुण लागताच अन्न सुरक्षा अधिकारी प्रविण काळे यांनी सहकाऱ्यांसह या भागात पाळत ठेवली. या ठिकाणाहून प्रतिबंधीत गुटखा विकला जात असल्याची खात्री झाल्यावर त्यांनी आपल्या पथकासह छापा टाकला. यावेळी आरोपी अंगद अशोक पवार (रा. बारड) हा गुटखाविक्री करताना आढळून आला. या कारवाईत विविध १९ कंपन्यांचा तब्बल २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.