महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सासू-सासऱ्याची भांडणे सोडवणाऱ्या विधवा सुनेचा खून, सासरा फरार - सुनेचा खून करून सासरा फरार

सासऱ्याने सुनेच्या डोक्यात काठी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या सुनेचा उपचरादारम्यान मृत्यू झाला. मीराबाई माधव मोरे असे त्या मृत्यू झालेल्या सुनेचे नाव आहे. तर किसन मोरे असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे.

सासू-सासऱ्याची भांडणे सोडवणाऱ्या विधवा सुनेचा खून, सासरा फरार
सासू-सासऱ्याची भांडणे सोडवणाऱ्या विधवा सुनेचा खून, सासरा फरार

By

Published : Aug 21, 2020, 2:42 PM IST

नायगाव/नांदेड - सासू-सासऱ्याचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या सुनेलाच आपला जीव गमवावा लागल्याची घटना नायगाव तालुक्यातील देगाव येथे घडली आहे. सासऱ्याने सुनेच्या डोक्यात काठी मारल्याने गंभीर जखमी झालेल्या सुनेचा उपचारादारम्यान मृत्यू झाला. मीराबाई माधव मोरे असे त्या मृत्यू झालेल्या सुनेचे नाव आहे. तर किसन मोरे असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे.

नायगाव तालुक्याच्या देगाव येथील किशन विठोबा मोरे (६५) यांचे त्यांच्या पत्नी पंचफुलाबाई यांच्याशी भांडण सुरू होते. हे भांडण टोकाला जात असल्याचे पाहून मोरे यांच्या विधवा सुनेने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. यातच किशन मोरे यांनी त्यांच्याकडील काठीने सून मीराबाई यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा वार इतका जबर होता की, यात मीराबाई या गंभीररित्या जखमी झाल्या. किशन मोरे यांनी केलेल्या मारहाणीत पंचफुलाबाई याही जखमी झाल्या आहेत. सून मीराबाईला सुरुवातीला नायगाव येथील शासकीय रुग्णालयात आणि त्यानंतर नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर पंचफुलाबाई यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.

आरोपी किशन मोरे हे देगाव येथे पत्नी, दोन विधवा सून आणि नातवंडासोबत राहत होते. त्यांची दोन्ही मुले हयात नाहीत. मृत मीराबाईला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर आरोपी किशन मोरे हा फरार झाला असून त्याच्यावर नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details