नांदेड - गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आज (दि.१५ऑगस्ट) जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनासाठी माहूर तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीपात्रात अनेक शेतकरी पाण्यात उतरले होते.
पीकविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न; पैनगंगा नदीपात्रात आंदोलन
गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आज (दि.१५ऑगस्ट) जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनासाठी माहूर तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदीपात्रात अनेक शेतकरी पाण्यात उतरले होते.
गतवर्षीचा पीकविमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्यावर्षी माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता. परंतु, अजूनही शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम मिळाली नसल्याने 'किसान ब्रिगेड संघटने'ने नदीपात्रात उतरून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलीस, महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्यापासून रोखले. तसेच पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तहसीलदारांच्या या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.