महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महावितरण विभागाचा भोंगळ कारभार; अनेक दिवसांपासून विद्युत खांब कोलमडून पडल्याने शेतकरी त्रस्त - मुखेड तालुक्यातील धामणगावमधील शेतकरी त्रस्त

मागील वर्षात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे सात महिन्यांपासून कोलमडलेले विद्युत खांब उभे केले नाहीत. त्यामुळे जवळपास 40 एकर जमीन पेरणीविना पडित ठेवावी लागली असल्याचे शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

कोलमडलेली खांब
कोलमडलेली खांब

By

Published : Jan 31, 2022, 11:49 PM IST

Updated : Feb 1, 2022, 12:15 AM IST

नांदेड - महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मुखेड तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. मागील वर्षात झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे सात महिन्यांपासून कोलमडलेले विद्युत खांब उभे केले नाहीत. त्यामुळे जवळपास 40 एकर जमीन पेरणीविना पडित ठेवावी लागली असल्याचे शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

धामनगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया



अतिवृष्टीत कोसळले होते विद्युत खांब

जून-जुलै महिन्यात सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक भागातील विद्युत खांब कोलमडून विद्युत प्रवाह खंडित झाला होता. मुखेड तालुक्यातील धामणगाव येथे देखील विद्युत खांब कोलमडून शेतीचे मोठे नुकसान झाले होते. ऐन पेरणीच्या काळात या घटना घडल्याने धामणगाव येथील जमीन पेरणीविना पडीत आहे. महावितरण विभागाने हे खांब उभे करण्या ऐवजी लाकडाचा आधार देत ते झुकते ठेवले आहेत.

महावितरण विभागाचा भोंगळ कारभार!

कोलमडलेले विद्युत खांब उभे करण्यासाठी धामणगाव येथील शेतकऱ्यांनी महावितरण विभागाकडे वारंवार निवेदन दिली आहेत. मात्र सात महिन्यांपासून महावितरण विभागाने याकडे लक्ष दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्युत प्रवाहाच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पेरणी न करता जमीन पडीत ठेवली आहे. खरीप हंगामासोबतच रब्बी हंगामात देखील पेरणी करता आली नाही. खांब बसवण्या ऐवजी त्याला लाकडाचा आधार देण्याचे काम महावितरण विभागाने केले आहे. महावितरण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे मुखेड तालुक्यातील धामणगाव येथील पंधरा शेतकऱ्यांची तब्बल चाळीस एकर जमीन पेरणीविना ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तत्काळ विद्युत खांब उभे करावीत अन्यथा आंदोलन करु, असा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

'कोलमडले विद्युत खांब तत्काळ उभे करणार'

सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे सर्वत्र पसरलेल्या पाण्यामुळे आणि चिखलामुळे मदतकार्य करणारी यंत्रणा नुकसानग्रस्त भगत पोहचू शकली नाही. महावितरण विभागाचे अधिकारी तत्काळ विद्युत खांब बसवणार आहे, अशी प्रतिक्रिया महावितरण विभागाचे सहायक अभियंता रवी धोटे यांनी दिली आहे.

हेही वाचा -Osmanabad Food business Story: ग्रामीण भागातील महिलांची भरारी; 21 प्रकारच्या भाज्यांनी बनवलेल्या शेवयांतून लाखोंची उलाढाल

Last Updated : Feb 1, 2022, 12:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details